गोव्याच्या पूर्व दिशेला पेडणे तालुकयामध्ये निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक गाव म्हणजे कासारवर्णे.
अशा ह्या निसर्गरम्य परिसरात महादेव, सातेरी, पंचायतन आणि इतर देव – देविकांच्या वासत्यवानि गजबजलेली ही पुण्य-पावन भूमी वर्षाच्या बारा महीने विविध प्रकारच्या सणांनी, उत्सवानी रंगलेली असते. कुठल्याही धार्मिक कार्यक्रमावेळी आवर्जून भाग घेणारे व मोठ्या उमेदीने काम करणार्या ह्या गावातील हरहुन्नरी तरुण वर्गाने एकसंघ रूपाने हा वारसा पुढे नेण्याचा वसा घेतला आणि २०१७ मध्ये सार्वजनिक गणेशपूजनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या कार्यक्रमांना, सणांना सुरुवात झाली. लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, व्याख्यानमाला, फुगडी सारख्या स्पर्धांच सुद्धा आयोजन करण्यात येत.
सांस्कृतिक कार्यक्रमा बरोबर गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणीक प्रकल्पांना सुद्धा आर्थिक सहायता दिली जाते. पारंपरिक जीवनशैली बरोबर आधुनिक विचारसरणीची जोड ह्या गावाचे वैशिष्ट्य आहे.
गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालय आयोजित, अखिल गोवा सार्वजनिक गणेश मंडळासाठी राज्यस्तरीय देखावा स्पर्धेत, कासारवर्णे सार्वजनिक गणेश मंडळास सलग ३ वर्षे (२०२२, २०२३, २०२४) प्रथम पारितोषिक मिळवले प्राप्त झाले.